Tel: 0231-2667877| Mail: therightneed@gmail.comआपलं कोल्हापूर

 कोल्हापूर किवा करवीर ही प्राचीन नगरी सातवाहन काळात एक समृद्ध नगर होते . या काळात कोल्हापूरचा रोम सारख्या पाश्च्यात नगराशी व्यापारी संबध प्रस्तापित झाला होता . ब्रम्हपुरी (टेकडी) कोल्हापूराच्या उत्खननातून या सर्व बाबी सिद्ध झाल्या आहेत . सातवाहनानंतर राष्ट्रकुल , चालुक्य, शिलाहार , अशा अनेक राजवंशाच्या राजवटी कोल्हापूरात होत्या . या सर्व राजवंशात शिलाहार राजवंशाने कोल्हापूर नगरीचा बराच विकास केला . आज अस्तित्वात असलेले पन्हाळा , पावनगड, खेळणा, गगनगड , भूदरगड आणि सामानगड हे सर्व किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले . त्यामुळे प्राचीन काळापासून कोल्हापूर शहरला एक समृद्ध परंपरा लाभलेली आढळले.


शिवशाही आणि कोल्हापूर

देवगिरीच्या यादवांचे राज्य संपुष्टात आल्या नंतर कोल्हापुर पारतंत्र्यात होते .जवळपास दीडशे वर्ष हे संस्थान आदिलशहाच्या सत्तेखाली होते. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधानंतर कोल्हापूरचा प्रांत स्वराज्यात आणला आणि त्यानंतर कोल्हापूरचा प्रदेश स्वराज्याचा अविभाज्य भाग बनला.शिवशाही नंतरही इंग्रज कोल्हापुरात येइ पर्यत कोल्हापूर स्वतंत्र होते.स्वराज्यातील अनेक महान पराक्रम कोल्हापूरच्या परिसरात घडलेले  आहेत .खालील काही घटना वाचल्यास आपल्याला त्याची साक्ष पटेल.
१ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले .
२ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे .
३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला .
४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या  भावपूर्ण भेटीचा हाच प्रदेश साक्षीदार आहे.
५ संभाजीराजास पकडणाऱ्या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली ,
६ औरंगजेबासारख्या अफाट सैन्यदलाला सात ते आठ वर्षे झुंजते ठेऊन खुद्द औरंगजेबाला हतबल करणाऱ्या महाराणी ताराराणीचा भद्रकाली पराक्रम कोल्हापूरने पाहिला.

कोल्हापूर जिल्हा हा एक पश्चिम महाराष्ट्रातील समृद्ध असा दक्षिणकाशी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे .कारण कोल्हापूर जिल्ह्याची मुख्य ओळख म्हणजे श्री .महालक्ष्मी मंदिर ,महालक्ष्मी देवी साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ आहे .कोल्हापूरच्या या देवीला अंबाबाई या नावावेही ओळखले जाते.
कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी व्याप्त आहे. या पर्वतरांगातून उगम पावणाऱ्या आठ नद्यांनी कोल्हापूरचा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. या पैकी पाच नद्याचं संगम  कोल्ह्पुरातील प्रयाग चिखली या ठिकाणी झाला आहे या नदीला पंचगंगा  म्हणून ओळखतात .कोल्ह्पुरात प्रसिद्ध असलेल्या विविध वस्तूंना कोल्हापुरी म्हणून ओळखले जाते .त्या मध्ये कोल्हापुरी साज,कोल्हापुरी गूळ कोल्हापुरी चप्पल ,तांबडा-पांढरा रस्सा ,मिसळ. इ. वस्तूचा समावेश होतो.
कोल्हापर विषयी आपण हे जाणता का ?

  १) इ.स.६३४ मध्ये चालुक्य घराण्यातील राजा कर्णदेव याने महालक्ष्मी मंदीराच्या उभारणीस प्रारंभ केला
२) इ.स.९ व्या शतकात महालक्ष्मी मंदीराची स्थापना झाली
३) १९५४ ते ७१ हा कालखंड कोल्हापूर शहराच्या गतिमान विस्ताराचा कालखंड होय
४) देशाची ऐतहासिक राजधानी कोल्हापूर होती
५) कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी सर्वोच्य न्यायालय होते.
६) महराष्ट्र प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्रीपद कोल्हापुराचे होते .
७) महालक्ष्मी देवीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता .म्हणून कोल्हापूर हे नाव पडले.
८) सपाट प्रदेशात एक हजार फुट उंचीवर शंखकृती हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेल्या जोतिबाच्या 
डोंगराला वाडी रत्नागीरी असे म्हणतात.
९) जोतीबा हे दैवत शिव वं सूर्याचे रूप मानण्यात यते.
१०) छत्रपती शाहू महाराज यांनी देशात प्रथम आरक्षण विधायक हे कोल्हापुरात अमलात आणले .
११) भारतातील पहिले धरण हे कोल्हापूर जिल्यातील राधानगरी हे होय .
१२) कोल्हापूर जिल्ह्यातील पाच नद्यांचा संगम झालेला आहे .त्यामुळे पंचगंगा असे नाव पडले आहे .
१३) भारतात एकून त्रेपन्न शक्तीपेठे महाराष्ट्रात आहेत .त्यापैके महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत .त्यापैकी महाराष्ट्रात  कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी हे एक  पूर्ण शक्तीपीठ आहे .
१४) कोल्हापूर चित्रपट सृष्टीचा जन्म झाला त्यामुळे कलेचे माहेरघर किवा कलापूर म्हणून ओळखले  
जाते
१५)  कोल्हापूरच्या प्रेक्षणीय ठिकाणामधील  एक महत्वपूर्ण स्थळ आहे पूर्वीच्याकाळी येथे एक मोठी पत्थ-
राची खाण होती   इ.स ८०० ते ९०० च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले. या भूकंपामुळे
भूगर्भातील पाणी वाहू लागले . या पाण्यामुळेच  तेथें मोठे तलाव तयार झाला.
१६) पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्वाचा किल्ला आहे . पन्हाळयाला पर्नाल्दुर्ग असे देखील  म्हणतात  कोल्हापूर जिल्ह्यात हजारो सहकारी संस्था कार्यरत आहेत विना सहकार नाही उद्धार हा मंत्र कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला दिला
१७) या तलावाजवळ रंकभैरव या  महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे त्याच्या नावावरून या तलावास रंकाळा हे नाव पडले
१८) रंकाळा तलाव शहराच्या नैऋत्य टोकाला आहे त्याचे छेत्र सुमारे २०२.३४ हेक्टर असून खोली जवळजवळ १०.६७ मीटर आहे
१९) कोल्हापुच्या वायवेस १४.४८ किलोमीटर अंतरावर जोतिबाचा डोंगर आहे
२०) कोल्हापूर शहर हे पहिले नगरपालिका होती नंतर ऑगस्ट १९७८ मध्ये खऱ्या अर्थाने पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली
२१) श्री. नानासाहेब याधव यांच्या काळात भारतात अन्यत्र कोठेही नसलेली स्मशानभूमी मोफत प्रेत दहन करण्याची यंत्रणा अमलात आली

कोल्हापूर जिल्ह्याची माहिती

क्षेत्रफळ :    ७७४६.४  चौ.कि.मी.
तालुके   :    १२ तालुके
शहरे    ;      १०
गावे    :     १२१७  
विद्युतीकरण  झेलेली गावे : १९९३
पंचायत समिती :१२
ग्रामपंचायत ;१०२६
महापालिका :१
नगरपालिका :९
लोकसंख्या ;३५ लाखाहून अधीक
पुरुष    :१८ लाखाहून अधीक
स्त्री  १७ लाखाहून अधीक
सह.साखर कारखाने :१७
सर्व सुत गिरण :४७
पाटबंधारे प्रकल्प ;४
पाटबंधारे  प्रकल्प  मध्यम : ८
लघु पाटबंधारे :५२ कासारी ,झुल्पेवाडी
मागासलेली वसतिगृह :५४

कोल्हापुरात आल्यावर काय पाहाल.?
महालक्ष्मी मंदिर 
२ जुना राजवाडा
३ कुस्त्यांचे खासबाग मैदान
४ केशवराव भोसले नाट्यगृह
५ कैलासगडची स्वारी मंदिर
६ दसरा चौक शाहू स्मारक मंदिर
७ शांतीकिरण स्टुडीओ
८ शालिनी स्टुडीओ
९ न्यू म्युझियम
१० जयप्रभा स्टुडीओ
११ पंचगंगा नदी (ब्रह्मपुरी )
१२ शिवाजी विद्यापीठ
१३ चंबुखडी
१४ टेंबलाई मंदिर
१५ कात्यायनी मंदिर
१६ श्री जोतीबा मंदिर डोंगर
१७ श्री नृसिंहवाडी
१८ बाहुबली
१९ शिवाजी उद्यमनगर
२० रंकाळा तलाव

 


View Larger Map